करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटेंसह २७ जणांवर गुन्हे तर चिवटेंनीही दाखल केला गुन्हा

प्रतिनिधी | करमाळा

मागील वर्षभरापुर्वी घडलेल्या प्रकरणात भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या सह २७ जणांवर मारहाण तसेच फिर्यादीच्या ३७ गायी आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे तर चिवटेंनीही संबंधित तक्रारदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. चिवटेंनीही २०१७ ते २०२१ दरम्यान फसवणुक झाल्याची तक्रार दिली आहे.

 

याप्रकरणात ज्ञानेश्वर पांडुरंग पवार वय २६ रा. वाघोली बस स्टॉप शेजारी हवेली जिल्हा पुणे यांनी सोलापुर येथे उपोषणला बसल्यानंतर सदरचा गुन्हा दाखल झाल्याची माहीती मिळत आहे. तर गणेश चिवटे यांचा व पवार यांचा ओळखीतुन दुधाच्या धंद्यात आर्थीक देवाणघेवाण सुरु होती त्यात सदरचे प्रकरण घडल्याचे दिसुन येत आहे.

 

यासंदर्भात ज्ञानेश्वर पवार यांनी करमाळ्यात गणेश चिवटे यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यात त्यांनी म्हणाले आहे की, नोव्हेंबर २०२१ मौजे खंडाळी ता. मोहोळ येथुन गणेश चिवटे व सहकाऱ्यांनी पवार यांची लाकडी दांडक्याने मारहाण केली व एकूण ३७ गायी तीन आयशर टेम्पोत घेतल्यावर पवार यांच्या जवळ असलेले ५ हजार पाचशे रुपये घेऊन आले.

ads

 

तर सदर तक्रार दाखल झाल्यानंतर भाजपा तालुकाध्यक्ष यांनी सुरुवातीला पत्रकारांजवळ सर्व प्रकरण सांगितले. यामध्ये कशा पद्धतीने त्यांचीच फसवणुक झालीय त्यांनी सांगितले याशिवाय ज्यावेळी ज्ञानेश्वर पवार हे चिवटेंकडे डेअरी मध्ये दुध घालत होते तेव्हा चिवटेंनी त्यांना गायी घेण्यासाठी आर्थीक सहकार्य केले होते. तर नंतर संबंधित व्यक्तीने परस्पर काही गायी विकल्या शिवाय दुधात भेसळ सुरु केली तेव्हा इंदापुरच्या मोठ्या नेत्याच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटले होते. पण आता तक्रार झाल्यावर चिवटेंनीही तक्रार दाखल केली आहे.

 

गणेश चिवटे हे करमाळ्यात दुध संकलन केद्र चालवतात. त्यात संशयीत ज्ञानेश्वर पांडुरंग पवार रा. सोगाव यांनी सन २०१७ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यत १४ लाख ९१ हजार ७३३  रक्कम रुपयांची फसवणुक केल्याची तक्रार दिली आहे. चिवटे यांच्या तक्रारीनुसार पवार यांनी दुध संकलन केंद्रामध्ये दुध घालणेकरिता वेळोवेळी चेक व रोख रक्कम स्वरुपात रक्कमा घेतलेल्या आहेत. सदर रक्कमेतील काही

रक्कम आरोपी मजकुर याने फिर्यादी यांचे दुध संकलन केंद्रात दुध घालुन परत केलेली आहे. उर्वरित रक्कम देणेकरिता पवार टाळाटाळ करीत होते. दोन्ही गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सागर कुंजीर हे करीत आहेत.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE