एकलव्य आश्रमशाळा येथे रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, फिजिओथेरपी शिबीर संपन्न
करमाळा समाचार
भटके विमुक्त जाती व आदिवासी ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष, भटक्या जमाती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने (भाऊ ) यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त युवा एकलव्य प्रतिष्ठान, एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा यांच्या वतीने ३१ ऑगस्ट रोजी एकलव्य आश्रमशाळा येथे रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, फिजिओथेरपी शिबीर असे कार्यक्रम घेण्यात आले.

सुरुवातीला वाढदिवसानिमित्त माने यांचा सन्मान कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी नगरसेवक कन्हैयालाल देवी, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजीराव जाधव, नगरसेवक संजय सावंत, डॉ. रोहन पाटील, डॉ. बाबुराव लावंड, डॉ. तुषार गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या राणीताई वारे, फारुख जमादार, फारुख बेग, नगरसेवक प्रविण जाधव, विनय ननवरे, ॲड. नवनाथ राखुंडे, ॲड. सुनिल घोलप, सुभाषराव जाधव, प्रा. अभिमन्यू माने, पत्रकार विशाल घोलप, दिनेश मडके, पोलीस अधिकारी बिभीषण जाधव, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे, रामदास जाधव, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब गोरे गुरुजी, जेष्ठ कुस्तीपटू सोपानभाऊ माने, प्रकाश माने, हनुमंत माने, बिलाल मदारी, राशीन भाजप युवा आघाडीचे विजय साळवे, राशीन युवक क्रांती दलाचे अध्यक्ष विनोद सोनवणे आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना देवी यांनी, माने यांचे सामाजिक कार्य प्रभावी आहे. तळागाळातील समाजासाठी ते करत असलेले काम आदर्श आहे. असे सांगितले. तर सन्मानाला उत्तर देताना माने भाऊ यांनी, यापुढील काळातही वंचित समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.
यावेळी माने भाऊ यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ६० रक्तदात्यांनी सहभाग घेवून रक्तदान केले. सोलापूर येथील मल्लिकार्जुन ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. रक्त संकलनासाठी प्रशांत भोसले, जमीर शेख, माँटी वाडे, पूनम डोलारे, साधू जगताप यांनी परिश्रम घेतले.
तसेच याप्रसंगी आयोजित आरोग्य शिबिरात डॉ. गणेश राऊत, डॉ. राहूल जाधव यांनी सेवा दिली. तर फिजिओथेरपी शिबिरात डॉ. अक्षय अडसूळ यांनी मार्गदर्शन करुन सेवा दिली. या शिबिराचा दोनशे तीस जणांनी लाभ घेतला.
उपस्थितांचे स्वागत स्वातीताई माने वहिनी, क्रांतीदिदी माने यांनी केले. आभार युवा एकलव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. संग्रामदादा माने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा शिक्षक, कर्मचारी वर्ग आणि युवा एकलव्य प्रतिष्ठानचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.