मानवता फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील मानवता फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. करमाळा तालुक्यातील रक्तदान साठी स्थापन करण्यात आलेल्या मानवता फाऊंडेशनच्या वतीने येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.

सदरील रक्तदान शिबीर जेऊर येथील स्वामी विवेकानंद हॉल येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत करण्यात येणार असून जास्तीतजास्त जणांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन मानवता फाऊंडेशनने केलेले आहे.
या अगोदर १५ आॕगस्ट २०२० ला मानवता फाउंडेशनच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते त्या रक्तदान शिबीरात २४२ रक्तदात्यांनी रक्तदान केलेले होते.