बोरगाव उपसरपंच विनय ननवरे यांचे विकासात्मक व सामाजिक क्षेत्रातले काम उल्लेखनीय
करमाळा समाचार
आज बोरगाव येथे जिल्हा परिषदच्या दलित वस्ती सुधार निधी मधून मिनरल वॉटर प्लॅन्टचे उद्घाटन महाराष्ट्र राज्यात सुप्रसिद्ध असलेले कवी मा.सुरेश शिंदे यांच्या हस्ते व उद्योजक मा. दादासाहेब सावंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. तर बोरगाव उपसरपंच विनय ननवरे यांचे विकासात्मक व सामाजिक क्षेत्रातले काम उल्लेखनीय आहे असे गौरोवद्वार ननवरे यांच्या बाबतीत बोलताना शिंदे यांनी केले. हा प्लॅन्ट ग्रामीण भागात चालू झाल्यामुळे ग्रामस्थांतुन या कामाचे कौतुक होत आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रसिद्ध कवी शिंदे बोलताना म्हणाले की, मानवाला बहुतेक आजारापैकी जास्त आजार हे पाण्यामुळे होतात आणि नदी काठच्या गावांना क्षार युक्त पाण्यामुळे पोटाचे विकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लक्षात घेता बोरगावचे उपसरपंच विनय ननवरे यांनी आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्याकडे मिनरल वॉटर च्या प्लॅन्टसाठी मागणी करून ती पूर्ण करून घेतली आहे. आरो प्लॅन्टचा कामगार, लाईट बिल व इतर खर्चासाठी लोकांकडून नाममात्र दरात म्हणजे फक्त 5 रुपया मध्ये 20 लिटर पाणी देण्याचे नियोजन बोरगाव ग्रामपंचायत ने केले आहे हा अगदी चांगला उपक्रम ननवरे यांनी राबवला आहे.
या कार्यक्रम प्रसंगी गावातील ग्रामसेवक मा विनोद इंगळे, सरपंच बिभीषण भोई, मा.सरपंच विलास ननवरे, मिठू भोज, आदिनाथ गायकवाड, सुरेश भोगल, पांडुरंग पाटील,बबन खराडे, आप्पासाहेब घाडगे, विजय घाडगे, दादा पाटील, किसन खराडे, गजेंद्र शिंदे,सोमनाथ खराडे, विनायक शिंदे, दत्ता गायकवाड, रूपचंद शिंदे, नवनाथ शिंदे, संदीप शिंदे, सचिन शिंदे, बापूराव गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.
