करमाळासोलापूर जिल्हा

सरपंच गावच्या विकासाचा आरसा – ॲड. विकास जाधव

करमाळा समाचार -संजय साखरे


सरपंच हा गावच्या व्यवस्थेचा कणा असतो. सरपंचाने ठरवलं तर गावाचा कायापालट होऊ शकतो याची अनेक उदाहरणे राळेगण सिद्धी व हिवरे बाजारच्या रूपाने आपल्यासमोर आहेत असे प्रतिपादन सरपंच परिषदेचे राज्य सरचिटणीस ऍड. विकास जाधव यांनी केले.

आज दुपारी करमाळा येथील पंचायत समिती सभागृहात सरपंच संवाद अभियान अंतर्गत करमाळा तालुक्यातील सरपंचांचा मेळावा पार पडला यावेळी ऍड जाधव बोलत होते.
देशाच्या पंतप्रधान इतकेच गाव पातळीवर सरपंचाचे अधिकार आहेत ,मात्र यासाठी सरपंचांनी एकत्र येऊन आपल्या गावाच्या समस्या प्रशासनापुढे मांडल्या पाहिजेत तरच खेडी सुधारतील. गावचा कारभार करत असताना सरपंचांनी कोणत्या प्रकारचे राजकारण न करता सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देऊन ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलता बदलावा असे आवाहन ही त्यांनी केले. जनतेतून सरपंच निवड योग्य असून सरपंचातून एक लोकप्रतिनिधी निवडावा यासाठी सरपंच परिषदेच्या मार्फत पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत सरडे, सरपंच परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आदिनाथ देशमुख, तालुका अध्यक्ष डॉक्टर अमोल दुरंदे ,पांडे च्या ग्रामपंचायत सदस्य सौ.क्षिरसागर आदि उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या करमाळा तालुका समन्वयक पदी सुजित बागल व भोजराज सुरवसे यांची निवड करण्यात आली .यावेळी करमाळा तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सरपंच प्रतिनिधी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल दुरंदे यांनी केले तर आभार पिंपळवाडी चे सरपंच पाटील यांनी मानले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE