सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठ्यांचा उद्या कॅन्डल मार्च
करमाळा समाचार
राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजाची आक्रमक आंदोलने सुरू झाली आहेत. तर सकल मराठा समाजाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी शांततेत आंदोलन करण्याची आवाहन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून करमाळा शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

आज सकल मराठा समाजाच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो मराठा समाजाचे कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी 48 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व कार्यवाही केली आहे.

त्यानंतर आता सकल मराठा समाजाच्या वतीने करमाळा शहरातील महादेव मंदिर किल्ला, वेताळ पेठ, फुलसंदर चौक, मेन रोड, जय महाराष्ट्र, गुजर गल्ली, भवानी पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरून कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. यामध्ये पुरुषांसह महिलाही सहभाग घेतील. याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना देण्यात आले आहे.