तीन फायर मधुन वाचला नरभक्षक बिबट्या ; बिटरगाव मध्ये शोध मोहिम सुरु
करमाळा समाचार
तालुक्यात तीन ठिकाणी हल्ले करुन ठार मारणारा बिबट्या सध्या बिटरगाव वांगी परिसरात असून त्याठिकाणी त्याच्यावर तब्बल तीन वेळा फायर करूनही त्यातून तो बचावला आहे. तर आता परिसरातीलच एका उसाच्या शेतात जाऊन लपून बसला आहे. त्या ठिकाणी पुन्हा एकदा शोध पथक व सापळे व पिंजरे रचण्यात आले आहेत. लवकरच त्याचा फडशा पडेल. या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वीही दोन वेळा बिबट्या वन विभागाच्या तावडीतून बचावलेला आहे.

