करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

नगरपरिषद शाळेत शिक्षण घेतलेली जान्हवी झाली डॉक्टर

करमाळा समाचार

 

येथील नगरपरिषदेच्या साधनाबाई नामदेवराव जगताप मुली क्रमांक एक शाळेत शिक्षण घेतलेल्या जान्हवी सतीश टांगडे हिने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात एमबीबीएसच्या अंतिम वर्षात यश प्राप्त करून वैद्यकीय पदवी मिळवली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जानवी टांगडे हिचे प्राथमिक शिक्षण करमाळा नगरपरिषदेच्या कै. साधनाबाई नामदेवराव जगताप मुली क्रमांक एक या शाळेत तर माध्यमिक शिक्षण हे महात्मा गांधी विद्यालय येथे झाले आहे. ज्युनियर कॉलेजला ती ए.डी. जोशी ज्युनिअर कॉलेज सोलापूर येथे तर एमबीबीएस चे शिक्षण श्री विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर या ठिकाणी झाले आहे. यापुढे तिने गायनॅक किंवा बालरोग तज्ञ चे पुढील शिक्षण घेणार असल्याची सांगितले आहे.

जान्हवी चा निकाल हाती आल्यानंतर तिच्या या यशाबद्दल शाळेची मुख्याध्यापक दयानंद चौधरी, शिक्षक रमेश नामदे, भालचंद्र निमगिरे, निलेश धर्माधिकारी, सुवर्णा वेळापूरे, सुनीता क्षिरसागर, चंद्रकला टांगडे, संध्या शिंदे, भाग्यश्री पिसे, तृप्ती बेडकुते आदि शिक्षक वर्ग यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या यशाबद्दल श्री सतीश नामदेव टांगडे(वडील), सौ चंद्रकला सतीश टांगडे (आई), श्री रमेश नामदेव तांगडे (काका), श्री नंदकुमार नामदेव टांगडे (काका) संतोष पांडुरंग टांगडे (काका) श्री अरुण पांडुरंग टांगडे (काका) अनुप नंदकुमार टांगडे (भाऊ), संदीप नंदकुमार टांगडे (भाऊ) प्रताप राजेंद्र टांगडे (भाऊ), सौ. अश्विनी रवींद्र काळे आदिंनी कौतुक केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE