करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सावधान! करमाळा शहराच्या हद्दीवर बिबट्याची एन्ट्री; नागोबा मंदिर परिसरात वावर

ब्रेकिंग न्यूज | करमाळा

सावधान! करमाळा शहराच्या हद्दीवर बिबट्याची एन्ट्री; नागोबा मंदिर परिसरात दर्शन

करमाळा : करमाळा शहराच्या पश्चिम दिशेला नागोबा मंदिर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ एका व्यक्तीला बिबट्या आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. शहराच्या हद्दीपर्यंत बिबट्या आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, देवीचा माळ परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिक, शेतकरी तसेच देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाणे, त्याला घेरणे किंवा फोटो व व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी करणे टाळावे. लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये. बिबट्या दिसल्याची माहिती तातडीने वनविभाग आणि पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

करमाळा शहराच्या पश्चिम भागात बिबट्याच्या दर्शनाच्या वृत्तामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहणे आवश्यक आहे. वनविभागाने परिसरात पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE