भूमी अभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ ; जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अनागोंदी कारभार सुरू असून लोकांना कामासाठी अनेकदा हेलपाटे घालून सुद्धा काम होत नाहीत नागरिकांना होणारा त्रास बंद तीव्र आंदोलन छेडू असा इशारा अखिल भारतीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन जगताप यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवले आहे. या संदर्भात यापूर्वीही अनेकदा तक्रारी झाल्या आहेत. परंतु सदरच्या कार्यालयाला कोणत्याच विभागाचा धाक नसल्याने दिसुन येते. सदरचे कर्मचारी हे वेळेवर कार्यालयात उपस्थित नसतात. त्याशिवाय लोकांची कामे होत नाहीत तरीही लोकांनाच अरेरावेची भाषा वापरली जाते. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांवर लगाम घालावा अशी मागणी जगताप यांनी केली आहे.
