नगरपरिषद प्राथमिक मुली नंबर 2 करमाळा या शाळेत बाल आनंद बाजार साजरा
करमाळा

करमाळा किल्ला वेस येथील नगरपरिषद प्राथमिक मुली नंबर 2 करमाळा या शाळेत बाल आनंद बाजार उत्साहात साजरा झाला. या बाजाराचे उद्घाटन नूतन नगराध्यक्षा मा.सौ मोहिनीताई सावंत यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास नगरसेवक श्री संजय अण्णा सावंत, नगरसेविका सौ. सुनीता ताई ढाणे, नगरसेविका श्रीमती जबीन मुलाणी उपस्थित होते. या कार्यक्रमास मार्गदर्शन माननीय प्रशासनाधिकारी श्री. अनिल बनसोडे साहेब यांनी केले.

या आनंदी बाजारास पहिली ते चौथीच्या 90 मुलींनी सहभाग घेतला. बाजारात विविध पालेभाज्या, फळभाज्या, स्टेशनरी, विविध फळे, खाऊचे स्टॉल मांडले होते. बाजारात एकूण जवळपास 60,000 रुपयांची उलाढाल झाली. यातून मुलींनी बालवयातच आनंददायी पद्धतीने व्यावहारिकतेचे धडे घेतले.
यावेळी मुख्याध्यापक श्री. बलभीम शिंदे यांनी प्रस्तावना करून मनोगत व्यक्त केले. सौ. प्रज्ञा जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर सौ.लता उबाळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक श्री. ब. पा. शिंदे ,सौ.लता उबाळे, सौ. प्रज्ञा जोशी व श्री भा.सो. निमगिरे यांनी केले. बाजारात नगराध्यक्षा सौ. मोहनीताई सावंत यांनी खरेदी करून बालचमूचे आणि या उपक्रमाचे कौतुक केले.


