करमाळाताज्या घडामोडीपंढरपूरसोलापूर जिल्हासोलापूर शहर

विठ्ठल पुजेवरुन रंगल्या चर्चा ; विठ्ठलाने ठाकरे, फडणवीस नंतर शिंदेंनाही नाकारले ?

प्रतिनिधी – करमाळा

शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरतला गेले त्यानंतर गुवाहाटी व गोव्याला गेले हा सर्व प्रकार घडत असताना प्रत्येक न्यूज चैनल असो किंवा प्रत्येकाच्या कट्ट्यावर फक्त सत्ता बदलाचा विषय सुरू होता. विठ्ठलाचे वारकरी व इतर विषय सर्वांनी टाळले होते. पण या सर्व विषयांच्या मधून एका विषयाकडे बऱ्याच जणांचे लक्ष होतं की नेमकी विठ्ठलाची पूजा कोण करणार ? आता अशी परिस्थिती झाली आहे की ठाकरे(uddhav thakarey) , फडवणीस नंतर शिंदेनाही पूजेचा मान मिळतोय का नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ekanath shinde) बंडखोर आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते. त्यादरम्यानच विठ्ठलाच्या पूजेच्या विषय सर्वत्र गाजू लागला होता. न्यूज चैनल व समाज माध्यमातून सत्ता बदल्याचीच विषय जरी असली त्या ठिकाणी वारीची चर्चा केली जात नव्हती. तरीही विठ्ठल पूजा वरून राजकारण पंढरपूरपर्यत गेले होते. त्यातच सत्ता बदलाचे संकेत आल्यानंतर विठ्ठलाच्या पूजेचा मान यंदा ठाकरेंना ऐवजी फडवणीसांना मिळेल अशी जोरदार चर्चा रंगू लागली होती. “मी पुन्हा येईल” म्हणत फडणवीस हे विठ्ठल पूजा करतील असे वाटू लागले असतानाच कोर्टापर्यंत निर्णय गेला व कोर्टाने 11 जुलै ही तारीख दिली.

सुनावणी एकादशी नंतर असल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना वाटू लागली की जोपर्यंत 11 जुलै येत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील. असाच अंदाज प्रत्येकाने बांधला होता. त्यामुळे यंदाची विठ्ठल पूजा ही उद्धव ठाकरेच करतील अशी आशा शिवसैनिकांना वाटू लागली. तसेच राष्ट्रवादीचे नेते आ. अमोल कोल्हे यांनीही याबाबत स्पष्ट बोलले होते. पण यातच भाजपाच्या व शिंदे गटाच्या हालचाली वाढल्या. त्यादरम्यांर राज्यपालांची भेट घेऊन ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी आधीच ठाकरे हे विठ्ठल पूजा करू शकणार नाही हे दिसून आले होते.

पुन्हा सर्वांचे नजरा या देवेंद्र फडवणीस (devendra fadavanis) यांच्याकडे गेल्या फडणवीसांनी मागील अडीच वर्षाच्या काळात सरकारला सरो की पळो करून ठेवले होते. त्यामुळे यंदाचा त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल अडीच वर्ष फिक्स मानला जात होता. त्यामुळे पदावर विराजमान होण्याआधीच त्यांच्या हातून विठ्ठल पूजा होते काय अशी चर्चा पुन्हा एकदा रंगु लागली. भाजपा व एकनाथ शिंदे गटाची एकत्रित पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये देवेंद्र फडवणीस यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असतील अशी घोषणा केली. त्यामुळे विठ्ठल पूजेचा मान फडवणीसांना न मिळता शिंदेंना मिळणार हे फिक्स झाले होते. त्यामुळे ठाकरे नंतर फडवणीसांचाही पत्ता कट झाला होता.

सर्वत्र चर्चा सुरू झाली विठ्ठलाला ठाकरेही नकोत आणि फडवणीसही नकोत, विठ्ठलाने ‘एकनाथा’ ला बोलवून घेतले. अशा चर्चा रंगू लागल्या या चर्चा सुरू असतानाच निवडणूक आयोगाने नुकत्याच नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या. या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रभर असल्याने जवळपास सर्व जिल्ह्यात या निवडणुका आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील निवडणुका ही आहेत. त्यामुळे सर्वत्र आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे. त्यामुळे आता ठाकरे फडणवीस यांच्यानंतर शिंदे ही पूजा करायला जाऊ शकतील का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता जर शिंदेंना पूजा करायचे असेल तर निवडणूक आयोगाकडून त्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय ते पूजेला जाऊ शकणार नाही.

त्याशिवाय त्यात एक पर्याय अद्याप शिल्लक आहे. त्यामध्ये ओबीसी आरक्षण व जनतेतून नगराध्यक्ष अशा विषयांसाठी बीजेपी व एकनाथ शिंदे गट हा निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करण्याची तयारी सुरू आहे. त्यावरून ते यशस्वी झाल्यास आचारसंहितेचे बंधन राहणार नाही व यंदाची निवडणूक पुढे जाईल. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे कोणत्याही परवानगीशिवाय पूजेला येतील हे नक्की आहे.

#pandharpur, @solapur, karmala

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE