आ. रोहित पवारांचाही स्वतः वरचा ताबा सुटला सैराटच्या गाण्यावर धरला ठेका
करमाळा समाचार
सध्या सर्वत्र तणावपूर्ण वातावरण असुन रोज कोण ना कोण गेल्याचे ऐकायला मिळत आहे. पण हाच तणाव दुर करण्यासाठी आता नव्या शक्कल लढवल्या जात आहेत. अशीच एक शक्कल आ. रोहित पवार यांनी लढवली. रुग्णांसाठी आयोजीत कार्यक्रमात स्वतःही नाचण्यापासुन स्वतःला रोखु शकले नाहीत.

गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या ‘झिंगाट’ गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो.
– आमदार रोहित पवार
