केत्तुर नंबर दोन येथे सापडलेल्या बेवारस मयताचा अद्याप पत्ता नाही ओळख असल्यास पोलिसांना साधा संपर्क ; फोटो विचलीत करु शकतो
दिलीप दंगाणे – करमाळा समाचार
करमाळा पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 18 जून रोजी बेवारस मयत हे मौजे केतुर नंबर 2 तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे शिवराज उदयसिंह मोरे पाटील यांच्या शेताजवळ उजनी जलाशयांमध्ये मिळून आले आहे. तरी ओळखीचा असेल तर करमाळा पोलिस स्टेशनचे संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ यांनी केली आहे.

संबंधित मयताचे वय 35 ते 40 वर्ष असून रंग सावळा आहे. डोक्यावर काळे पांढरे केस, दाढी वाढलेली, अंगात कपडे नसलेला, कमरेस काळा रंगाचा धागा, वीटकरी रंगाची GOLD कंपनीची अंडरवेअर तरी अशा प्रकारच्या वर्णनाचे कोणीही ओळखत असल्यास झिरो 21 82 220 333 व
95 52 56 53 39 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती केली आहे.
