पाणी आल्यानंतर दशरथ कांबळे यांची पहिली प्रतिक्रिया ; तसेच कुकडी लाभक्षेत्रात मांगीचा समावेश हीच भुमीका
प्रतिनिधी सुनिल भोसले
शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने कुकडीचे अतिरिक्त पाणी मांगी तलावात व दहीगावचे पाणी म्हसेवाडी तलावात सोडण्यात यावे म्हणुन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरआण्णा कांबळे यांनी करमाळा बायपास येथे सर्वाना बरोबर घेऊन सरपंच व विविध विकास सोसायटीचे पदाधिकारी यांना बरोबर घेऊन राजकारण न करता रस्ता रोको आंदोलन केले. त्याच क्षणी प्रशासनाने आंदोलनाची दखल घेऊन आतापर्यंत कुकडीच्या पाण्यावर राजकारण करणाऱ्यांची बोलती बंद केली.

आमदार संजयमामा यांनी केलेल्या प्रयत्नानतंर मांगी तलावात 500 क्यु.दाबाने पाणी सोडले होते. केवळ आंदोलनाची बातमी कळताच 1500 दाबाने पाणी सोडण्यात आले. तर दहिगावचे ही पाणी सोडण्यात आले. या संदर्भात दशरआण्णा कांबळे म्हणाले, करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून कुकडीचे पाणी मांगी तलावात सोडावे म्हणून शासनदरबारी पाठपुरावा केला आणी आम्ही शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने रस्तावरची लढाई लढुन जास्त दाबाने पाणी सोडण्यात भाग पाडले, ही लढाई माझी एकट्याची नसुन सर्वाची आहे. आंदोलन केल्यामुळे न्याय मिळाला म्हणुन झालेला विजय हा माझा नाही सर्व लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांचा आहे म्हणून आंदोलनाची दखल घेत जास्त दाबाने पाणी सोडावे लागले. आता कुकडीचे पाणी मांगी तलावात आले आहे आणी दहिगावचे ही पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. येथुन पुढची आमची लढाई कुकडी लाभक्षेत्रात मांगी तलाव समाविष्ट करावा अशी प्रमुख मागणी राहिल यासाठी जनतेने एकत्र येणं गरजेचं आहे असे दशरथआण्णा कांबळे म्हणाले.
