मोहल्ला गल्लीतील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
करमाळा समाचार
करमाळा शहरातील मोहल्ला गल्ली येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार दिवसापासून तसाच प्रलंबित आहे मौहल्ला गल्ली येथील पिण्याच्या पाण्याची लाईन खराब झालेली असून मोहल्ला गल्ली येथील सर्व नागरिकांना पाण्याची गैरसोय होत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा येत असून महिलांची फार तारांबळ उडत आहे व तसेच मोहल्ला गल्ली येथील गटारीचे कामे बऱ्याच दिवसापासून झालेले नसून घाणीचे प्रमाण फार वाढले आहे व गटारीचे काम नवीन झालेले नाही

करमाळा नगर परिषदेला वारंवार सांगून कामाच्या बाबतीत दुर्लक्ष करण्यात येत आहे व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर फक्त टाईम काढू पणा करण्यात येत आहे. तर सर्व गल्लीतील नागरिक या गैरसोयनी नागरिकांना त्रास होत आहे. मोहल्ला गल्लीतील सांगूनही कामे होत नसून महिलांचा रोष नगरपालिकेवर वाढत आहे. तसेच आज मोहल्ला गल्ली सर्व नागरिकाकडून नगरपरिषदेला कामाबद्दल निवेदन देण्यात आले. यावेळी करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या बरोबर चर्चा करून मुख्याधिकारी म्हणाले लवकरात लवकर तुम्हाला सर्व प्रश्न मार्गी लावायचे काम करतो असे आश्वासन देण्यात आले.

या वेळी निवेदन देण्यासाठी फारूक बेग, फारूक जमादार, आझाद शेख, आलिम खान, बब्बू बेग, जिशान कबीर, इक्बाल शेख, जहांगीर बेग, अनिस कबीर, इरशाद शेख, मोहल्ला गल्लीतील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.