लंपी स्कीन डिसिज प्रादुर्भाव रोखण्यासाठी साखरेंची मागणी ; सी एम ओएस डी मंगेश चिवटेंकडुन दखल
करमाळा समाचार – संजय साखरे
महाराष्ट्र राज्यातील जळगाव, नगर, अकोला पुणे व धुळे या जिल्ह्यांमध्ये पाळीव जनावरांमध्ये लंपी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याचे निष्पन्न झाले असून नगर जिल्ह्यात या रोगाचे मुख्य केंद्र झाले आहे .नगर जिल्हा करमाळा तालुक्याला लागून असून यामुळे याचा प्रादुर्भाव करमाळा तालुक्यातील होण्याची शक्यता आहे.

याचीच खबरदारी म्हणून प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सदर रोग नियंत्रणाबाबत काळजी घेऊन कार्यवाही करावी व करमाळा तालुक्यासाठी लसीचा लवकरात लवकर पुरवठा करावा अशी मागणी राजुरी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत साखरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्र्याचे ओ एस डी श्री मंगेशजी चिवटे यांच्या माध्यमातून केली आहे.
यासंदर्भात मंगेश चिवटे यांनी जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर यांना संपर्क करून करमाळा तालुक्यातील लंपी रोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक लसीचा लवकरात लवकर पुरवठा करण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती श्रीकांत साखरे यांनी दिली आहे.
