करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा टेंभुर्णी रस्त्यावर भिषण अपघात ; अपघातात तीन जनावरे ठार

समाचार टीम

अहमदनगर – टेंभुर्णी महामार्गावर सकाळी सहाच्या सुमारास भरधाव वेगात जाणाऱ्या एका माल ट्रकने दिगंबररावजी बागल पेट्रोल पंप शेजारी चार जनावरांना धडक दिली आहे. सदर अपघातात एक जखमी तर तीन (दुरुस्ती – चार जनावरे) जनावरे ठार झाले आहे. सदर चालक हा पळून जात असताना त्याला गावकऱ्यांनी पाठलाग करून कुंभेज फाटा येथे पकडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देवळाली येथील श्री शिंदे हे आपल्या म्हशी चारण्यासाठी परिसरात गेले होते. या ठिकाणी बागल पेट्रोल पंप येथील रस्त्याच्या कडेला काही म्हशी या चरत होत्या. करमाळ्याच्या दिशेने एक ट्रक TN 52 H 0733 हा भरधाव वेगाने आला व त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या एक हल्या एक म्हैस व दोन रेड्या यांना धडक देऊन तसाच पुढे निघून गेला.

धडक एवढी जोराची होती की यामध्ये एक रेडी जखमी झाली आहे. तर इतर चार जनावरे जागीच ठार झाले आहेत. यामध्ये शेतकऱ्याचे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झालेली आहे. एवढा मोठा अपघात घडल्यानंतर सदरचा ट्रक चालक हा त्या ठिकाणी न थांबता तसाच पुढे निघून गेला. यावेळी सदरच्या घटनेबाबत माहिती मिळताच देवळाली व परिसरातील लोकांनी त्याचा पाठलाग केला.

त्याचा पाठलाग करून कुंभेज फाटा येथे त्याला गाठले व पुन्हा एकदा त्याला बागल पेट्रोल पंप या ठिकाणी घेऊन आले आहे. याबाबतची माहिती करमाळ्यात वेगळाच पसरल्यानंतर संबंधित ट्रकचालकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE