तहसिलच्या कर्मचाऱ्यांना ठोकडे मॅडमचे शिस्तीचे धडे ; पाच कर्मचाऱ्यांना उशीरा आल्याचा दंड
करमाळा समाचार
नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी आपल्या कामाची पद्धत कर्मचाऱ्यांना दाखवून दिली आहे. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अर्धी पगार करण्याची कारवाई करीत ठोकडे यांनी वेगळा आदर्श इतरांसमोर ठेवला आहे. कार्यालयीन कामकाजात वेळखाऊ पणा केला जातो. याबाबत बऱ्याच तक्रारी ही त्यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे ठोकडे यांनी स्वतःहून प्रत्येक टेबलची माहिती घेतल्याचेही त्यांनी सांगितले. तर मंगळवारी तीन क्लार्क व दोन शिपायांवर उशीरा आल्याने अर्ध्या पगाराची कारवाई करण्यात आली आहे.

तहसील कार्यालयात सकाळी येण्याची वेळ साडेनऊ असतानाही कर्मचारी वेळेवर न आल्यामुळे सदरची कारवाई करण्यात आली आहे. बऱ्याच दिवसानंतर करमाळा तालुक्याला तहसीलदार मिळाले आहेत. तर दरम्यानच्या काळात पूर्ण वेळ तहसीलदार नव्हते. तात्पुरता पदभार हा नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला होता जाधव यांनी बराच काळ या कर्मचाऱ्यांसोबत काम केले आहे. एकप्रकारे त्याचा फायदा बरेच जण घेत होते. पण तहसीलदार पदी रुजू होतात शिल्पा ठोकडे यांनी आपल्या कामाची पद्धत दाखवून दिली आहे. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारल्याने येणाऱ्या काळात नक्कीच सर्व सुतासारखे सरळ झालेली दिसून येतील. सदरच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन व लोकांच्या कामाच्या प्रती विशेष लक्ष देण्याच्या सूचना ठोकडे यांनी दिले आहेत. त्याशिवाय लोकांच्या तक्रारी आधीच प्रत्येक टेबलवर कोणते काम रखडलेली आहेत याचीही चौकशी करून संबंधित कामे मार्गी लावण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

रस्त्याच्या ३५० तक्रारी …
तालुक्यात मागील बरेच दिवसांपासून तहसीलदार प्रभारी असल्यामुळे दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांमधील वाद व त्यांच्या रस्त्याच्या तक्रारी रखडलेल्या होत्या. या तक्रारीचा आकडा आता तालुक्यातून साडे तीनशे पार गेला आहे.यामुळे सर्व तक्रारी बांधावर जाऊन सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यापासून सुरुवात करणार असल्याचं श्रीमती ठोकडे यांनी सांगितले.
तक्रार येण्याआधी निपटारा …
तहसीलदार यांच्याकडे दालनात येऊन बहुजन संघर्ष सेनेच्या जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी कुणबी दाखले कागदपत्र फलक, शेतीची रखडलेली दुरुस्ती, कैद्यांना भेटण्यापासून अडवणूक व पुरवठा विभागात वाढीव कर्मचारी याबाबत तक्रार केली पण लगेच त्यावर कोणती कार्यवाही सुरु आहे हे तहसिलदार ठोकडे यांनी सांगितले त्यामुळे तक्रार पेंडींग न ठेवणाऱ्या अधिकारी आल्याने कदम यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी ठोकडे यांनी कुणबी सुचना फलक लावण्याच्या सुचना दिल्या व पुरवठा विभागात नवे कर्मचारी नेमणुक करण्यास सांगितली आहे तर कैद्यांना भेटण्याचा अधिकार कोण हिराऊ शकत नाही हे ही सांगितले त्यामुळे एका झटक्यात सगळी उत्तरे मिळाली त्यामुळे तक्रारदाराने समाधान व्यक्त केले .