छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून एस.बी.ग्राफिक्सच्या वर्धापन दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप
करमाळा प्रतिनिधी –
करमाळा शहरातील व तालुक्यातील एस.बी.ग्राफिक्स या दुकानाच्या एक वर्षपूर्ती निमित्ताने व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उमरड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

एस.बी.ग्राफिक्सचे मालक चि.संकेत सूर्यकांत भोसले यांनी एस. बी. ग्राफिक्स च्या वर्धापन दिनानिमित्त वायफळ खर्च न करता गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करून शिवजयंती व वर्धापन दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. याचे करमाळा परिसरातून व शहरातून कौतुक केले जात आहे.

चि.भोसले यांनी उमरड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील गरजू विद्यार्थ्यांना वही आणि पेन चे वाटप केले आहे. यावेळी आदिनाथ सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. वामनराव बदे, श्री. बापूसाहेब चोरमले (सरपंच), श्री. प्रमोद बदे माजी संचालक, श्री. संदिप बदे राहुल बदे, लालासाहेब पडवळे ,श्री. गणपत कोठावळे, श्री. सिताराम भिल (मुख्याध्यापक), श्री. गौतम कदम, श्री. अनिल यादव सर यांनी चि. संकेत भोसले यांचा सत्कार करून वर्धापन दिन केक कापून साजरा केला.
यावेळी श्री.अनिल यादव,श्री. गणपत कोठावळे, चि. संकेत भोसले यांनी आपल्या भाषणाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी शालेय विद्यार्थी चि. समर्थ यादव,चि. अद्वैत गोडगे ,चि. शिवराज पठाडे यांनी अतिशय सुरेख भाषणे केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जि.प. प्राथमिक शाळा उमरड व व्यवस्थापन समिती, यश भुजबळ, वर्धराज वांगडे ऋषिकेश वाघमोडे, ओम कदम, अभि लावंड आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अनिल यादव सर यांनी केले.