करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मोहिते पाटलांनी घेतली सावंत यांची भेट ; निंबाळकरांना पहिला झटका ?

करमाळा समाचार – विशाल घोलप

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धैर्यशील मोहिते पाटील व रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांच्याही वेगवेगळ्या बैठका नुकत्याच संपन्न झाल्या. मोहिते पाटलांच्या बैठकीमध्ये करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील दिसून आले तर निंबाळकरांच्या बैठकीचे नेतृत्वच आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असल्याचे दिसून आले धैर्यशील मोहिते पाटील यांच्या दौऱ्या दरम्यान निंबाळकर यांना पहिला झटका देण्याचं काम सावंत यांनी केला आहे. आमदार संजयमामा यांचे निकटवर्तीय मानले जाणारे व तालुक्यात राजकारणात मोठा प्रभाव असलेले सावंत गटाने मात्र महाविकास आघाडीचे काम करण्याची भूमिका घेतल्याने निंबाळकरांना पहिला झटका मानला जात आहे.

सध्याच्या परिस्थितीत मोहिते पाटील यांनी दौरे करण्यासाठी सुरुवात केली आहे. परंतु अजूनही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेले नाही. मोहिते पाटील गटाने बंड करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. परंतु अजूनही ते अपक्ष राहतील का राष्ट्रवादी कडून निवडणूक लढतील हा प्रश्न आहे. यावर अद्यापही मोहिते पाटील यांनी आपली भुमीकेबद्दल स्पष्ट बोलले नाहीत. त्यामुळे तालुक्यातील महाविकास आघाडीतील कार्यकर्ते अजूनही उघडपणे मोहिते पाटलांसोबत फिरताना दिसत नाहीत. तर तालुक्यात प्रभाव असलेल्या ठिकाणी मोहिते हे आवर्जून जाऊन भेटीगाठी घेत आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी आज सावंत परिवाराची भेट घेतली.

तर आमदार संजय मामा शिंदे यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात असलेले रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी जबाबदारी घेतल्याचे दिसून येत आहे. त्या अनुषंगाने कालची बैठकही संजयमामा शिंदे यांच्या फार्म हाऊस वर झाली. त्या ठिकाणी बैठकीचे नेतृत्वही संजयमामा करीत असल्याबाबत माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मामांना मानणारे सर्व गट तट हे मामांबरोबर असतील अशी शक्यता मानली जात होती. पण करमाळ्यातील सावंत गटाने घेतलेल्या भूमिकेने निंबाळकरांना पहिला झटका बसू शकतो.

तालुक्याच्या राजकारणात संजयमामा शिंदे यांच्यासोबत कायम असणारा महत्त्वाच्या गटापैकी एक गट म्हणजे सावंत गट मानला जातो. सर्वात जवळचा सावंत गट विधानसभेला शिंदे गटाची ताकद म्हणून काम करताना करमाळ्यात बऱ्याच वेळा दिसून आलेला आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत गटाने आपली भूमिका जाहीर केली असून सावंत हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे. त्यातच आज धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा येथे आल्यानंतर सावंत यांची भेट घेतली. ज्या शिंदे यांच्या आधारावर निंबाळकर युद्ध लढायला चालले आहेत. त्याच शिंदे यांच्या जवळच्या गटाने अशी भूमिका घेणे हा निंबाळकरांना झटका मानला जात आहे.

आज धैर्यशील भैय्या मोहिते पाटील हे आमच्या परिवाराची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी लोकसभा निवडणुकी संदर्भात चर्चाही झाली. आम्ही आमची भूमिका पहिलेच जाहीर केली आहे. जो उमेदवार महाविकास आघाडीतून लढेल आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत.
– सुनिल सावंत, सावंत गट.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE