घाबरु नका … बिबट्या बाबत ही माहीती तुम्हाला माहीत आहे का ?
करमाळा समाचार
तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन बळी गेल्यानंतर पहिल्यांदाच सात तारखेला बिबट्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसून आला होता. त्यापूर्वी एकदाही बिबट्याने दर्शन दिले नव्हते. तर प्रत्येकच भागात बिबट्या दिसल्या बाबत चर्चा तर होत्याच. त्याशिवाय काही लोकांच्या शेतांमध्ये बिबट्याचे ठसे आढळून आले होते. त्यावरून एकापेक्षा अधिक बिबट्या असल्याबाबत करमाळा समाचार ने वृत्त जाहीर केले होते. उलट वनविभागानेही आता मान्य करायला सुरुवात केली आहे. तर घाबरु नका … नरभक्षक बिबट्या मारला गेलाय.

त्यानंतर आता बिबट्याला ठार मारल्यानंतर ठार झालेल्या बिबट्याचे शवविच्छेदन व इतर माहिती गोळा केल्यानंतर हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या ठार झाल्याचे वनविभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. तर सुरुवातीला चिखलठाण मध्ये बिबट्याला घेरण्यात आले होते. त्यादिवशीही भोसे, मांगी परिसरात बिबट्या दिसल्याचे नागरिक सांगत होती.

हे ही वाचा … ८ डिसेंबर ला केले जाहीर बिबट्याची संख्या एक पेक्षा जास्त असण्याची शक्यता
तर बिबट्या ठार करण्याच्या एक दिवस आधी उंदरगाव परिसरात बिबट्या दिसून आल्याचे स्थानिकांनी सांगितले होते. तर बिबट्या वांगी परिसरातच असल्याची वनविभागाची माहिती होती. यामुळेच एकापेक्षा अधिक बिबट्या करमाळा तालुक्यात असल्याचे दिसून येत होते. तर वन विभागाने यापैकी नरभक्षक एकच असल्याचे जाहीर करून थोडासा दिलासा दिला. मात्र भीतीचे वातावरण आजही करमाळा तालुक्यात आहे.
सात तारखे नंतर आजपर्यंत एकही हल्ला कोणत्याच व्यक्तीवर झाला नसल्याने वनविभाग सांगतोय ते अगदी खरे असं दिसून येत आहे. तर अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले परिसरात झाले आहेत. त्यावेळी वनविभागाने तरसने केल्याबाबत सांगण्यात आले होते. पण आता बिबट्या एका पेक्षा जास्त असल्याचे मान्य करु लागले आहे त्यामुळे बिबट्याचा छडा तर लावाच शिवाय तरसह ताब्यात घ्या अशी मागणी लोक करीत आहेत.