महत्वाच्या कारणामुळे थोड्याच वेळात दहिगाव आवर्तन होणार बंद
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून जवळपास 96 दिवस आवर्तन सुरु ठेवल्यानंतर आता आज पासून पुढील तयारीसाठी डागडुजीच्या कामानिमित्त हे आवर्तन बंद केला करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय मामा शिंदे यांच्या वतीने देण्यात आले आहे.

दहिगाव उपसा सिंचनाच्या माध्यमातून सध्या तालुक्यातील दुष्काळी भाग हा सुजलाम-सुफलाम होताना दिसत आहे. त्यामुळे उसाच्या ही क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील 96 दिवसांपासून सुरू असलेले हे आवर्तन आता डागडुजीच्या निमित्ताने बंद करण्यात येणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घेणे आवश्यक आहे.

रब्बी हंगामपूर्व तयारीसाठी मेन्टेनन्स कामे करणे तसेच कॅनॉल अस्तरीकरण इत्यादी कामांसाठी दिनांक 5 ऑगस्ट 2021 पासून सुरू असलेले खरीप आवर्तन आज दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता आपण बंद करत आहोत . सकाळी 11 वाजता दहिगाव येथील पंप बंद होतील. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता कुंभेज येथील पंप बंद होतील याची नोंद घ्यावी.
– आ. संजयमामा शिंदे, करमाळा.