कोरोना काळात चोरही बदलले आणी चोरीच्या वस्तुही ; करमाळ्यात बागवान नगरात जीवनावश्यक वस्तुंची चोरी
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील नवीन वस्तीत बागवान नगर येथे किराणा दुकानांमध्ये बाजूच्या पत्रा शेड उचकटून आत प्रवेश करून परवेज बागवान यांच्या दुकानातून 42 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

सदर चे ठिकाण गावाबाहेर जरी असले तरी मुख्य राशीन – करमाळा रस्त्यावर असल्याने सतत वाहतूक त्याठिकाणी असते. परंतु सध्या कोरोना काळात वाहतूक बंद असल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

परवेज अब्दुल माजिद बागवान वय 36 हे 22 मे रोजी अकरा वाजता दुकान बंद करून गेले. त्यावेळी बाजूचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश करून सोळा हजार 100 रुपये किमतीचे 15 लिटरचे तेल डबे, तीन हजार पाचशे रुपयांचे 50 किलो वजनाचे दोन साखरेचे कट्टे, 5500 तांदळाचे 25 किलो वजनाचे पाच कट्टे, 6120 जेमिनी तेलाचे एक लिटर चे पॅक असलेले तीन बॉक्स, अठराशे रुपयाचे पाच लिटरचे दोन कॅंड तेल, नऊ हजार तीनशे रुपयाची मुरली कंपनीचे पाच लिटर कॅनचे तीन बॉक्स असे एकूण 42 हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.