करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात अल्पवयीन दुचाकीस्वारांवर कारवाई ; २४ हजारांचा दंड

करमाळा समाचार

करमाळा शहरात सकाळी ट्युशनसाठी बरेच मुलं मोटरसायकल वर भरधाव वेगात जात असतात. याबाबत करमाळा तालुक्यातील सुजाण नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर आता याला चाप बसला आहे. शहरात सकाळपासून संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करत आतापर्यंत 24 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरातील घोलप नगर, कॉलेज रोड, महेंद्र नगर परिसरातील ट्युशनला येत असलेले विद्यार्थी हे दुसरीकडे घाई गडबडीत जात असताना एकमेकांमध्ये रेस लावल्यासारखे प्रकार करीत होते. याचा त्रास इतरांना होत होता. त्याशिवाय त्यांच्याही अपघाताचे प्रकार घडत होते. त्यामुळे या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती.

सोमवारी सकाळी आशा वीस वाहनांवर कारवाई करत 24 हजार सातशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक विनायक माहूरकर, निर्भया पथक अंमलदार हवालदार डुकरे, संभाजी पवार, गुटाळ व ट्रॅफिक अमलदार कांबळे यांच्या वतीने करण्यात आली.

पालकांनी मुलांच्या सोयीसाठी दिलेली मोटरसायकल त्याचा गैरवापर मुले करत असल्याने पालकांनी त्यांच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. त्याशिवाय अशा प्रकारच्या दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE