अखेर पालकमंत्री चंद्रकांत दादा मा. आमदार पाटील यांच्या भेटीला ; बंद दाराआड चर्चा
करमाळा समाचार
माजी आमदार नारायण पाटील तालुक्याचे प्रमुख नेते असतानाही त्यांना आजच्या बैठकीतून व भेटीतून डावल्याच्या चर्चा झाल्यानंतर अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार नारायण पाटील यांची आवर्जून भेट घेतल्याचे दिसून येत आहे. नुकताच त्यांनी माजी आमदार पाटील यांची जेऊर परिसरातील एका हॉटेलवर भेट घेतली. बराच काळ त्यांची बंद दाराआड चर्चा सुरु आहे. यावेळी आ. जयकुमार गोरेही उपस्थित होते.


तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार नारायण पाटील यांना डावलून राजकारण होऊ शकत नाही ही बाब स्पष्ट असली तरी भाजपाकडून त्यांच्या मानधरणीचे कोणतेही प्रयत्न सुरू नव्हते असे चित्र दिसून येत होते. आजच्या बैठकीतून व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमधूनही पाटील यांना वगळले असल्याने तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले होते. या पार्श्वभूमीवर सदरची भेट ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
विशेष म्हणजे या बैठकीमध्ये माजी आमदार पाटील यांना भेटण्यासाठी पाटील यांच्यासह केवळ आ. जयकुमार गोरे व माजी आमदार प्रशांत परिचारक हेच एका रुम मध्ये असल्याचे दिसत आहेत. खा. निंबाळकरही ताफ्यात होते पण त्यांनी भेट घेण्यासाठी गेले नाहीत याचीही चर्चा होत आहे. नेमके निंबाळकर का भेटायला गेले नसतील ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ते भेट घेतील का ?