पाच वर्षांच्या लहान चिमुरडीनी घरगुती उपाय करूनच कोरोना रोगांवर केली मात
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील पूर्व भागांतील निमगाव (ह)येथील रेशन दुकानदार गणेश मधुकर नीळ यांची कन्या ईश्र्वरी या पाच वर्षांच्या लहान चिमुरडीला सुरवातीला थोडा ताप, सर्दी खोकला येणे सुरू झाला. त्यामुळे तिची आरोग्य तपासणी केली असता तिचा कोरोना बाधित म्हणून रिपोर्ट आला होता.

त्यामुळे तीला आरोग्य सेविका सौ. निकुंभे मॅडम व आशा वर्कर निर्मला इंगळे यांनी गोळ्या औषधे देऊन तिच्यावर उपचार सुरू केले होते. याशिवाय तीने नियमित घरगुती उपाय करूनच, गरम पाणी, हळद कडा,व हभप बापू महाराज नीळ यांनी दिलेली झेंडू बोंडाची बुकटी तयार करून तिचा धूर ओडण्यास सांगितले होते तीने नियमित धूर घेतला व व्यायाम करत या भयानक परिस्थिती मध्ये कोरोना रोगांवर मात करून ती आत्ता एकदम ठणठणीत झाली आहे.
कोरोना लागण झाली आहे अशा सर्वच रुग्णांनी न घाबरता न डगमगता घरगुती व आरोग्य विभाग यांच्या सूचनेनुसार उपचार घेतल्यास नक्कीच या रोगांवर मात करु शकतो हे या पाच वर्षांच्या लहान मुलीने दाखवून दिले आहे.

गणेश मधुकर नीळ यांनी आरोग्य सेविका, आशा वर्कर व बापू महाराज नीळ यांचे विशेष आभार मानले.