वन अधिकारी आप्पासाहेब निकत राज्यस्तरीय रजत पदकाने सन्मानित
प्रतिनिधी सुनिल भोसले
करमाळा तालुक्यातील सुपुत्र विभागीय वन अधिकारी आप्पासाहेब सुभाष निकत यांना महाराष्ट्र शासनाकडून वनसेवतील सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय रजत पदकाने (Silver medal) सन्मानित करण्यात आले निकत हे मुळचे उंदरगाव ता. करमाळा चे सुपूत्र दि. २५ नोव्हेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयाद्वारे त्यांना हा सन्मान जाहीर केला आहे.

वन विभागामध्ये सर्वोत्कृष्ट नावीण्यपूर्ण व विकासात्मक प्रभावी कार्य केल्याबद्दल विभागीय वन अधिकारी या संवर्गात रजत पदक पुरस्कार देऊन महारास्ट्र शासनाकडून सन्मान व गौरव केला जातो.

सन२००९ पासून वन विभागात आणि सन २०१६पासून उस्मानाबाद जिल्हा व रायगड जिल्ह्याचे विभागीय वन अधिकारी म्हणून केलेल्या नाविन्यपूर्ण व विकासात्मक उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने पदक व पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. या सन्माना शिवाय त्यांना WWF कडून ‘ one earth one home या चळवळीमध्ये उत्कृष्ट काम केल्या बद्दल ‘ उत्कृष्ट जिल्हा वन अधिकारी ‘ म्हणून गौरविण्यात आले आहे.
शेतकरी कुटूंबात जन्मलेले आप्पासाहेब निकत यांचे हे यश वाखाणण्याजोगे आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण उंदरगाव येथे तर माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजी विदयालय कोर्टी येथे झाले आहे.त्यांच्या या यशाबद्दल करमाळा तालुक्यासह सर्वत्र कौतूक होत आहे.