करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

चिखलठाण येथे दत्त जयंती निमित्ताने गुरु चरीत्र वाचन

चिखलठाण प्रतिनिधी

दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र चिखलठाण यांच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्त चिखलठाण येथे विठ्ठल रूक्मिणी मंदीर येथे श्री स्वामी समर्थ महाराज व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर चे पिता देश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपाशीर्वादाने युवा संत चंद्रकांत दादासाहेब यांच्या प्रेरणेतून श्री दत्त जयंती चिखलठाण येथे गुरु चरीत्र वाचनाने संपन्न झाली. या सप्ताहास बाबासाहेब तळोले व स्वप्निल इनामिके यांच्या मार्गदर्शनाखाली २०डिसेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत चिखलठाण येथील महीलांमधून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

याप्रसंगी सुशांत नलवडे , सत्यम रोकडे , प्रथमेश उंबरे , प्रमोद गव्हाणे , यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले तर कार्यक्रमाला प्राची गव्हाणे , गयाबाई गव्हाणे , गणू बाई गव्हाणे , अनुसया सरडे , सुरेखा नलवडे , रूपाली पवार , शेषाबाई चव्हाण , सुरेखा पोळ , तुळसाबाई चव्हाण, तेजस्विनी बारस्कर , सारिका शिंगटे , लता पोळ , मनीषा पवार , विजयालक्ष्मी ठोंबरे , ज्योती कळसाईत, अश्विनी जाडकर , रेखा कवितके , वैष्णवी नलवडे , वैशाली नलवडे , अलका लोंढे , पल्लवी कांबळे, भारती मराळ , स्मिता गोमे , सुप्रिया सरडे , मनीषा सरडे , राघिनी सरडे, मनीषा शिंगटे , शोभा तोरकड , साक्षी चव्हाण , दिपाली चव्हाण , अनिता देवमाने , श्रद्धा देवमाने, रुक्मिणी वाघमारे , सुवर्णा बारकुंड , साधना चव्हाण, अलका कवितके,निर्मला गलांडे, विजया हजारे. यांच्यासह बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE