माजी आमदार नारायण पाटील व संचालक मंडळ कारखानास्थळी दाखल ; माहीती मिळताच शेतकऱ्यांनी केली गर्दी
समाचार टीम
ऊस उत्पादक व कामगारांच्या पाठबळावर आदिनाथ कारखाना सुस्थितीत आणणार असल्याचा ठाम विश्वास माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केला. आदिनाथ कारखान्याच्या सद्यस्थिती विषयी माहिती जाणून घेण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी विद्यमान संचालकांसह कारखाना कार्यस्थळावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांनी बाॅयलरसह यांत्रिक विभागातील महत्वाच्या यंत्रणेचा आढावा घेतला. तसेच काही कामांचा श्रीफळ वाढवून श्रीगणेशा केला.

यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की, न्यायालयीन लढा देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आरोग्य मंत्री तानाजी सावंत सर यांची साथ मोलाची ठरली. शिंदे-फडणवीस सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळेच आदिनाथ कारखाना संकटातुन बाहेर काढणे सोपे जात आहे. विद्यमान संचालक मंडळ यांनीही महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. आता आगामीकाळात सर्वांना बरोबर घेऊन यंदाचा गाळप हंगाम सुरू करण्याचा आम्हा सर्वांचा मानस असून कामगार व सभासदांनीही आता पुढाकार घेऊन आपापली जबाबदारी पार पाडल्यास निश्चितच आदिनाथ कारखान्याच्या गाळप हंगामास सुरुवात होईल अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. तर कामगारांना योग्य तो न्याय देऊन नियमित पगारांविषयी दक्षता बाळगून तातडीची कार्यवाही केली जाईल असे आश्वासन माजी आमदार नारायण पाटील यांनी दिले.
यावेळी प्रा जयप्रकाश बीले, हरिदास डांगे व सौ सवितादेवी राजेभोसले यांनीही विचार मांडले. आदिनाथ कारखान्याच्या पाहणीसाठी माजी आमदार नारायण पाटील व संचालक मंडळ जाणार असल्याचे वृत्त समजताच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने कारखाना कार्यस्थळावर हजेरी लावली.
यावेळी त्यांचे समवेत मा अध्यक्ष व विद्यमान संचालक संतोष पाटील, रमेश कांबळे, पोपटराव सरडे,डाॅ केवारे, नितीन जगदाळे, रामभाऊ पवार, मा. स. धुळाभाऊ कोकरे, नवनाथ झोळ, नवनाथ शिंदे, डॉ वसंत पुंडे, कार्यकारी संचालक बागनोर, मा. कार्यकारी संचालक हरिदास डांगे, जयप्रकाश बिले सर, सभापती अतुल पाटील, मा. सभापती गहिनीनाथ ननवरे व शेखर गाडे, जि प सदस्या सौ. सवितादेवी राजेभोसले, उपसभापती पै. दत्ता सरडे, पं स सदस्य दत्ता जाधव,मा उपसभापती नितीन जगदाळे, बाजार समिती संचालक देवानंद बागल, बाबासाहेब बोरकर, शहाजी राऊत, रमणसिंग बापू, मा जि प सदस्य चंद्रप्रकाश दराडे,मा संचालक रामभाऊ पवार,बहूजन संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ कदम,सरपंच महादेव पोरे, महेंद्र पाटील, पंडीत वळेकर, कृषी भुषण दादासाहेब पाटील,मा सरपंच राजू गादिया, सचीव प्रा अर्जूनराव सरक, श्रीमंत चौधरी, गोपाळ मंगवडे, विजय नवले, पै. पृथ्वीराज पाटील, रामेश्वर तळेकर, गणेश जाधव, दत्ता देशमुख, बाबासाहेब कोपनर, सरपंच संदिप मारकड, नवीनशेठ दोशी, पै विजय गुटाळ, राजू झोळ, उपसरपंच संजय तोरमल,युवराज भोसले, नाना आदलिंग, दादा लोंढे, संतोषबापू पाटील,आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते.