माजी केद्रीय मुख्याध्यापक सर्जेराव दगडू उगले यांचे वृद्धापकाळाने निधन
दिलीप दंगाणे – जिंती
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा जिंती चे माजी केंद्रीय मुख्याध्यापक सर्जेराव दगडू उगले यांचे आज सकाळी राहत्या घरी पोमलवाडी येते वृद्धापकाळाने निधन झाले. उगले गुरुजी हे 1985 साला मध्ये ते जिंती प्राथमिक केंद्रशाळेवरती केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होते.

ते मनमिळाऊ स्वभावाचे होते. धोतर, नेहरू शर्ट, कोल्हापुरी चप्पल असा त्यांचा साधा पेहराव होता. ते 1985 सालात जिंती येथील प्राथमिक केंद्र शाळा वरती पोमलवाडी येथून सायकल द्वारे यायचे. त्यांचा जन्म 1928 चा होता ते वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले हि बातमी ऐकून जिंती गावातील अनेक जणांचे डोळे पानवले.
त्यांनी शिकवलेल्या विद्यार्थ्यांपैकी बरेच विद्यार्थी शासकीय नोकरीत लागले आहेत. निवृत्तीनंतर त्यांचा संपर्क जिंतीकरांशी सतत होत होता.
