इंदापुरचे मैदान गाजवले ; जिंतीच्या दंगाणेची दमदार कामगिरी
करमाळा समाचार
दिनांक 31 ऑगस्ट 2023 ते 2 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये इंदापूर तालुका शासकीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन मारकड कुस्ती केंद्र इंदापूर येथे करण्यात आले होते.

त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज इंदापूर चा विद्यार्थी रोहित दिलीप दंगाणे येणे वयोगट 17 वजन गट 51 किलो मध्ये इंदापूर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवला असल्यामुळे रोहित दंगाणे याची निवड जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली असून रोहित दंगाने हा मारकड कुस्ती केंद्र इंदापूर येथे सराव करत असून त्याला कुस्तीचे प्रशिक्षण एन .आय .एस .कोच मारुती मारकड सर , तसेच एन .आय .एस .कोच सागर (दादा) मारकड तसेच वस्ताद संजय मारकड, वस्ताद गोविंद निकम, यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

तर रयत शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक संजयकुमार शिंगारे साहेब , पर्यवेक्षिका सौं पुष्पा काळे मॅडम तसेच क्रीडा शिक्षक सुनील मोहिते सर यांचे देखील मार्गदर्शन असून रोहित दंगाने हा करमाळा तालुक्यातील जिंती गावचा सुपुत्र असल्यामुळे जिंती गावचे पैलवान अमर उर्फ बापू धेंडे, तसेच राजेंद्र उर्फ बंटू पाटील , वस्ताद नानासाहेब वाघमोडे ,जिंती गावचे सरपंच शामभाऊ ओंभासे पाटील, तसेच ग्रामपंचायत माजी सदस्य गणेश घोरपडे, वस्ताद धनाजी माने यांनी रोहित दंगाने याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.