गॅस तुटवड्याची झळ हॉटेल व्यवसायाला; अनेक हॉटेल बंद
करमाळा :

शहर व तालुक्यात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत असल्याने हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. गॅस सिलिंडर वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे हॉटेल चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गॅसअभावी स्वयंपाक करणे कठीण होत असल्याने काही हॉटेल चालकांनी हॉटेल बंद ठेवण्याचा विचार सुरू केला असून, परिस्थिती अशीच राहिली तर अनेक हॉटेल तात्पुरती बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यामुळे ग्राहकांनाही गैरसोय होण्याची शक्यता आहे. गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.


