आदिनाथ कारखान्याबाबत आनंदाची बातमी ; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते गळीत शुभारंभ
करमाळा समाचार
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सन २२- २३ चा ऊस गळीत हंगाम शुभारंभ रविवार दिनांक २५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे तर आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत प्रमुख उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी दिली.

या कार्यक्रमास माजी आमदार नारायण पाटील व बागल गटाच्या नेत्यां रश्मी बागल, महाराष्ट्र राज्य साखर संघ संचालीका मुंबई, हे उपस्थित राहणार आहेत असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कारखान्यामधील सर्व कामे झालेले आहेत. त्यामुळे यावर्षीचा सन २२-२३ या गळीत हंगाम चांगल्या प्रकारे यशस्वी होईल. असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे. दि २५ डिसेंबर रोजी होणाऱ्या उस गळीत हंगाम शुभारंभासाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, माजी संचालक मंडळ, शेतकरी, सभासद यांनी उपस्थित रहावे. असे कार्यकारी संचालक श्री. अरुण बागनवर यांनी आवाहन केले आहे.