विद्यार्थी व पालकांसाठी खुशखबर ; सुट्टीच्या दिवशीही मिळणार दाखले
करमाळा समाचार
विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश करता आवश्यक प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध करून देणे बाबत निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव जिल्हा सेतू समिती सोलापूर शमा पवार यांनी महत्त्वाचा निर्णय घेत असताना माहे जून ते ऑगस्ट 2023 च्या कालावधीमध्ये सर्व दिवस शासकीय सुट्टी दिवशीही सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपले सरकार सेवा केंद्र सुरू ठेवण्यात यावे यासह इतर आदेश दिले आहेत. जेणेकरून पालक व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. या निर्णयाचे पालक वर्गातून स्वागत केले जात आहे.

याआधी जो अर्ज आधी त्यालाच दाखला या पद्धतीचा नियम लागू करण्यात आला होता. त्याने जो विद्यार्थी सुरुवातीला दाखला करून त्याला आधी दाखला मिळण्यास मदत होणार होती. तर आता सुट्टीच्या दिवशीही दाखले मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ होणार नाही. केंद्र अधिसूचित ठिकाणीच्या परिसरातील शाळा महाविद्यालयातील संबंधित मुख्याध्यापक प्राचार्य यांचे संपर्क साधून विद्यार्थ्यांना वितरित दाखले उपलब्ध करून देणे कामी शिबिरांची आयोजन करण्यात यावे अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.

शिवाय स्वाक्षरी झालेले दाखले विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना संपर्क साधून तातडीने वितरित करण्यात यावे. या सूचना पवार यांनी दिल्याने पालकांना नक्की याचा लाभ होईल.