गृप ग्रामपंचायतीने पाटील गटाला तारले एका गावात एकच सदस्य आला तरी सत्ता कायम ; सत्ता आल्यावर बदलणार समीकरणे
प्रतिनिधी सुनिल भोसले
पांडे गृप ग्रामपंचायत निवडणुकीत जुन्याना डावलुन नविन चेहऱ्याना मतदारांनी संधी दिली. ही निवडणूक अटीतटीची लढत झाली. पाटील गटाची सत्ता कायम रहाणार आहे. या निवडणुकीत पांडे गावातुन पाटील गट स्वतत्र लढत होता. तर दुसरीकडे गहिनीनाथ दुधे यांनी बंडखोरी करत बागल , शिंदे, पाटील (बंडखोर), भाजपा एकत्र पॅनल उभा केला. तर आता सत्ता आल्यानंतर पुन्हा पाटील गटाला दोन सदस्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यामध्ये पांडे येथे पाटील गटाचे (बंडखोर), भाजप, बागल गट, शिंदे गट एकुण सहा सदस्य निवडुन आले. तर पांड्यातुन एक व खांबेवाडी धायखिंडी मधुन पाटील गटाचे सहा उमेदवार विजयी झाले असल्याने सरपंच कोण होणार याकडे लक्ष लागले आहे.

आता पाटील गटाकडे एक हाती सत्ता राहणार असली तरी यात अजून दोघांची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेमकी ते दोघे कोण अजूनही गुलदस्त्यात असले तरी दबक्या आवाजात आम्ही पाटील गटाचेचे आहोत असे सांगण्यात येत आहे. तरी लवकरच त्याचा खुलासा केला जाईल असेही ही पाटील गटाच्या वतीने सांगण्यात येत आहे.