उद्यान दूताकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन ; राजुरीतील शेतकऱ्यांना लागवड , संगोपनाचे महत्व
करमाळा समाचार – संजय साखरे
फलटण जिल्हा सातारा येथील श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयातील उद्यान दूत प्रतीक भरत साखरे याने ग्रामीण उद्यान विद्या कार्यानुभव उपक्रमांतर्गत राजुरी तालुका करमाळा येथील शेतकऱ्यांना वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन याचे महत्त्व पटवून दिले.

तसेच कार्यानुभव उपक्रमांतर्गत एकात्मिक कीडनियंत्रण ,मृदा परीक्षण, एकात्मिक रोग नियंत्रण, एकात्मिक खतांचा वापर इत्यादी विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी दुरंदे, तुकाराम दुरंदे ,सतीस साखरे, अर्जुन साखरे, दीपक दुरंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
यासाठी त्याला श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस डी. निंबाळकर, प्रा.पाटील सर, प्रा. लिंबे सर ,प्रा. शहा सर, प्रा. बनकर सर, प्रा. रणवरे सर. व प्रा. शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले.