E-Paperकरमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

जिल्हाधिकाऱ्यांची काहींवर नाराजी तर , काहींना कौतुकाची थाप – शेतकरी व व्यापारी भेटीपासुन वंचीत

करमाळा समाचार 

कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी करण्याच्यासाठी वेगवान टेस्टिंग व टेस्टिंगसाठी पाठवलेल्या अहवालांचा वेळोवेळी पाठपुरावा करून रुग्णांना विलगीकरण करून घ्यावे. तर होम आयसोलेशन पूर्ण बंद करून उर्वरित दिवसांमध्ये कडक निर्बंधाचे पालन करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (milind shambharkar) यांनी करमाळा (karmala) येथे दिल्या आहेत. तर करमाळा येथे ऑक्सिजन केंद्र उभा राहत आहे त्यालाही जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे. पण जिल्हाधिकारी यांनी वेळ कमी देत पुढील कामानिमित्त गेल्याने व्यापारी संघटनासह शेतकरी प्रश्नासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची भेट होऊ शकली नाही.

कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज करमाळा येथे भेट दिली. यावेळी प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी राजाराम भोंग, पोलिस निरिक्षक सुर्यकांत कोकणे, मुख्याधिकारी वीणा पवार, वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय अमोल डुकरे व विविध कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत वेगवान शोध मोहीम राबवून कोरोना रुग्ण विलगीकरण कक्षात पाठवण्यासाठी सूचना दिल्या तर सोलापूर येथे अहवाल पाठवल्यानंतर तो लवकरात लवकर मिळावा यासाठी पाठपुरावा करणे काढावा असेही त्यांनी सांगितले

आरोग्य विभागावर नाराजी व्यक्त करत असताना उपजिल्हा रुग्णालय येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मात्र जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले आहे. मागील वेळी कोरोना काळात ऑक्सिजन पुरवठा कमी पडत होता. या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय येथे ५० ऑक्सिजन सिलेंडर भरतील अशा पद्धतीचे अत्याधुनिक केंद्र उभे करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून हवेतून ऑक्सिजन गोळा करण्याचे कामही मशीन करणार आहे. ती मशीन प्रत्येक बेडपर्यंत ऑक्सिजन पुरवठा करेल असे नियोजन आहे. तरी इतर तालुक्यात पेक्षा करमाळा तालुक्यात पाठपुरावा करून ऑक्सीजन केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने जोमात काम सुरू आहे. जवळपास काम पूर्ण झाल्याने उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कौतुकाची थाप यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सध्या कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये करमाळा तालुक्याचा समावेश आहे. कोरोना रुग्ण अधिक नसताना करमाळ्यातील निर्बंध शिथिल करावे या मागणीसाठी जगदीश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी संघटनेचे कार्यकर्ते आले होते. परंतु जिल्हाधिकारी यांनी पुढील कामासाठी गेल्यामुळे त्या कार्यकर्त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. तर ग्रामीण भागातही महावितरणच्या वतीने विजेची बिले न भरल्याने वीज कनेक्शन तोडले जात आहे. त्यामुळे नाराज शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी येण्यापूर्वीच जिल्हाधिकारी यांनी करमाळ्यातील निघून गेल्याने शेतकरी व पक्षाचे पदाधिकारी यासह अनेकांचा हिरमोड झाला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE