मुख्यरस्त्यावरील ट्राफिक नागरीकांसाठी डोकेदुखी ; पोलिस निरिक्षक कोकणे यांनी काढला नवीन पर्याय
करमाळा समाचार
करमाळा येथील मुख्य रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतुकीची अडचणीत वाढ होत आहे. तर आता त्यावर तोडगा म्हणुन जीवन सम विषम अशा पद्धतीची पार्किंग व्यवस्था करण्याचे नियोजन पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी आखले आहे. यासंदर्भात सर्व व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांना सूचना देण्यात येणार आहेत.

शहरातील मुख्य रस्ता संगम चौक ते फुलसुंदर चौक या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीला अडथळा तसेच गाड्यांचा खच असल्याने अनेक अडचणी निर्माण होत असतात. याबाबत अनेकदा तक्रारीही झाल्या आहेत. परंतु त्या समस्या कमी होताना दिसून येत नाहीत.

नुकत्याच एका बैठकीमध्ये रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीच्या अडचणींना पर्याय म्हणून पार्किंग सम विषम करण्याचे नियोजन असल्याचे कोकणे यांनी जाहीर केले आहे. तर मुख्य रस्त्यावरील अत्यावश्यक सेवेमुळे वाहतूक बंद करता येत नाही. शिवाय पार्किंगची व्यवस्थाही असावीच लागते आणि रुग्णास दाखल करून रुग्णाचे नातेवाईक धावपळ कुठे करणार असे अनेक प्रश्न असतात. त्यामुळेच आता वाहतूक बंद नाही केली तरी सम विषम हा पर्याय राबविला जाऊ शकतो असा प्रस्ताव सध्या पोलिस ठाण्याकडून मांडण्यात आलेला आहे.
सम-विषम तारखेप्रमाणे वाहतुकीचा तोडगा कितपत फायदेशीर ठरेल हा येणारा काळच ठरवेल. परिसरातील एका बाजूला गाड्या लावण्याचे नियोजन ठरल्यास लोक आजही व्यवस्थित गाड्यांना लावत नसल्याचे दिसुन येते त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे लोकांनी जबाबदारीने आपले वाहन लावल्यास वाहतुकीवर तोडगा निघू शकतो.