आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मान्य केल्या विविध मागण्या ; डॉक्टरांच्या विरोधातील तक्रारीचा समावेश
करमाळा समाचार
करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे यांची आज भेट घेतली. त्यावेळी करमाळा तालुक्यातील आरोग्य सेवा बाबतीत चर्चा झाली. करमाळा तालुका मधील करोना लसीकरणचे डोस वाढवण्याची मागणी टोपे साहेब यांच्या कडे केली. त्याच प्रमाणे करोना काळामध्ये करमाळा तालुका मधील विस्कळीत झालेली आरोग्य सेवा त्याच प्रमाणे खाजगी कोव्हीड सेंटर चालक डाॅ यांच्या मार्फत गोरगरीब रूग्णा कडून भरमसाठ बील वसुली करण्यात आली आहे. या बाबतीत चर्चा झाली.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लवकरात लवकर आपल्या सर्व मागणी मान्य करून करमाळा तालुका साठी लसीकरणचे डोस वाढवुन देण्याचे आश्वासन दिले. त्या प्रमाणे ज्या हाॅस्पिटल मध्ये कोव्हीड सेंटर मधून रूग्णाची अधिक बिले आकारली आहेत त्याची चौकशी करू आसे आश्वासन टोपे साहेब यांनी दिले.
त्याच वेळी बोलताना आमदार संजय मामा शिंदे हे सतत आरोग्य सेवा बाबतीत संवेदनशील आसतात करमाळ्यातील आरोग्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आसतात असे मा.टोपे साहेब म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील, शहर अध्यक्ष शिवराज जगताप, युवक जिल्हा सरचिटणीस गौरव झांर्जुने, उपाध्यक्ष महेश काळे पाटील उपस्थित होते.
