आध्यात्मिककरमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

हिंदु मुस्लिम सामाजिक बांधिलकी ; आठ वर्षापासुन दिंड्यांचे स्वागत करतेय तांबोळी कुटुंब

करमाळा समाचार


शहरामध्ये मागील आठ वर्षांपासून जवळपास ६०० किमी लांबून श्री संत ज्ञानेश्वर सेवा या पालखीचे आगमन होते. विशेष म्हणजे सदरची पालखीचा स्थानिक उद्योजक तथा माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी कुटुंबीय करतात. यातून हिंदू मुस्लिम सामाजिक बांधिलकी दिसून येते. दिंडीचा पाहुणचार करताना तांबोळी कुटुंबीय तसेच समाजातील काही मंडळी सदरच्या दिंडीत सहभागी होतात. यंदाच्या वेळी श्री संत ज्ञानेश्वर सेवा इंदौर या पालखीचे स्वागत मुस्लिम समाजाच्या वतीने करमाळ्यातील औद्योगिक वसाहतीत नगरसेवक अल्ताफ तांबोळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमीर तांबोळी यांनी केले.

महाराष्ट्रातील काही नागरिक व्यापारासाठी मध्यप्रदेशात गेली होते व तेथेच ते स्थायिक झाले. परंतु आजही ते पंढरपूरच्या आषाढी एकादशीला यायचे विसरले नाही. सदरची दिंडी ही इंदौर वरुन चापडगाव जिल्हा अहमदनगर येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी स्थळी येतात व तेथुन पायी चालत करमाळ्यात मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान तांबोळी यांच्या कडे त्यांचा पहिला मुक्काम असतो.

त्याठिकाणी तांबोळी बंधु सर्व वारकरी संप्रदायाची जेवणाची व राहण्याची व्यवस्था गेल्या अनेक ८ वर्षांपासून करत आहेत. तांबोळी बंधु दुसऱ्या दिवशी सकाळी मार्गस्थ होईपर्यंत यथोचित आदरातिथ्य करून संपूर्ण वारकऱ्यांना पंढरपूर कडे मार्गस्थ करतात. तसेच हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हाजी उस्मान तांबोळी व हाजी अल्ताफ तांबोळी यांनी आज पर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवत राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दिवाळी, श्री गणेश उत्सव किंवा ईद आदी सणांमध्ये तांबोळी बंधु चा सहभाग कायम असतो. तांबोळी बंधुनी कोवीड काळात केलेली सेवा या कामाची दखल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊन हाजी उस्मान तांबोळी यांचा सन्मान केला होता.

politics

आज श्री संत ज्ञानेश्वर सेवा इंदौर या पालखीचे आगमन झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी पालखीचे पुजन केले. यावेळी नगरसेवक अल्ताफ तांबोळी, नगरसेवक संजय सावंत, शिवसेना शहरप्रमुख संजय शिंदे, प्रविण कटारिया, फारुक जमादार, नितीन घोलप, राजेंद्र घाडगे, तौफिक शेख वाजीद शेख, मजहर नालबंद जयमहाराष्ट्र मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सदरच्या दिंडीतील प्रमुखांनी आमच्याकडे विचारणा केली त्यावेळी आम्ही तात्काळ होकार दिला. मुळातच विठ्ठल भक्त व हिंदु बांधवांची सेवा करण्याचे आम्हाला भाग्य मिळाले त्यामुळे आम्हालाही आनंद झाला आहे. मुळातच करमाळा तालुका सर्व धर्म समभाव पद्धतीने वागतो त्याची प्रचिती आम्हाला निवडणूक काळात दिसुन येते हिंदु धर्मीय लोकांची संख्या जास्त असताना आम्हाला तिथे नगरसेवक म्हणुन संधी दिली जाते. तर मुस्लिम समाज गणपती दिवाळीत तर हिंदु समाज रमजान मध्ये मिळुन मिसळुन काम करतात. यातच दोन्ही समाजातील एकमेंकांवर प्रेम दिसुन येते.
अल्ताफ तांबोळी, माजी नगरसेवक करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE