दलित युवकांना हाताशी धरून नथीतून तीर मारणे बंद करा – कांबळे
प्रतिनिधी सुनिल भोसले
राजकीय हस्तक्षेपामुळे घडत असलेल्या खोट्या तक्रारी व गंभीर स्वरूपाचे गुन्हे ॲट्राॅसिटी करण्यासाठी दलितांचा वापर करणे व बहुजन समाजातील तरूणांना भडकवणे यावर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या .

गेल्या अनेक दिवसापासून सत्ता आणि संपत्तीच्या मोहापायी धनदांडग्या प्रस्थापितांन मध्ये संघर्ष सुरू आहे. त्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार असलेल्या दलित व्यक्तींना बळीचा बकरा करून ॲट्रॉसिटी सारख्या दलित समाजाचे सुरक्षा कवच असलेल्या कायद्याचा वापर होत असताना दिसत आहे.
धनदांडग्या प्रस्थापितांच्या मनगटामध्ये जर दम असेल तर सत्ता संपत्तीसाठी त्यांनी समोरासमोर येऊन लढावे गरिबांच्या आर्थिक कमकुवतीचा गैरफायदा घेऊन आपले नपुसंकपणा सिद्ध करू नये.
दलित व्यक्तींना माझे आवाहन आहे की बाबांनो आपल्याला कायद्याने मिळालेल्या सुरक्षा कवचाचा धनदांडग्या प्रस्थापितांकडून गैरवापर होणार नाही, याची काळजी घ्या भावनिक होऊ नका त्यांच्या दडपणाला घाबरू नका.
कारण एखाद्या ठिकाणी खरंच ॲट्रॉसिटी सारखा शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडल्यास हेच प्रस्थापित धनदांडगे आपल्याकडे खोटे गुन्हे दाखल करतात म्हणून संशयाने पाहतात गरीब बहुजन समाजातील तरुणांना भडकवतात व संपूर्ण समाजाला बदनाम करतात. परंतु अशा या प्रकरणात जर तुमच्यावर कोणाचे दडपण आले किंवा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास माझ्याशी संपर्क करा.

माझा मोबाईल नंबर 9604650077. काही समाजातील धनदांडग्या प्रस्थापितांना माझे आवाहन आहे की, असे प्रकार पूर्वीसुद्धा झालेले आहेत येथून पुढे तुमच्या सत्ता संपत्तीच्या संघर्षात तुमच्या मनगटात दम असेल तर तुमच्या हिमतीवर एकमेकांची जिरवा आमचे उसणे अवसान घेऊ नका. पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की, अशा प्रकरणात धनदांडग्या प्रस्थापितांचा वैयक्तिक हस्तक्षेप किंवा राजकीय दडपण आणण्याचा प्रकार निदर्शनास आल्यास धनदांडग्या प्रस्थापितांविरोधात समाजद्रोही किंवा कायदेशीर गुन्हा दाखल करावा असे आवाहन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना केले .