करमाळापंढरपूरमाढासोलापूर जिल्हा

करमाळ्यात “या” दोन गावांना भेट देणार माजी मुख्यमंत्री विरोधीपक्षनेते फडणवीस ; संपुर्ण दौऱ्याची माहीती

करमाळा समाचार – सुनिल भोसले 

अतिवृष्टी झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे 19 ऑक्टोंबर रोजी पुणे, सोलापूर व उस्मानाबाद दौरा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये करमाळ्यातील दोन गावांना ते भेटी देणार आहेत. तर साधारण दुपारी दोन वाजण्याच्या नंतर ते करमाळ्यातील कंदर व शेलगाव या गावांचा नुकसान ग्रस्त भागातील पाहणी करणार आहेत.

राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ता. 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत.

ता. 19 ला ते बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी, ता. 20 रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत.

असा असेल फडणवीस यांचा संपुर्ण दौरा ..

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE