करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मोठे गट सोबत नसताना कडवी झुंज देत आहेत प्रा. झोळ ; सुनावणीचा निकाल बाजुने लागण्याची आशा

मकाई निवडणुक –

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काही दिवसांवर आलेली असताना अपात्र अर्जावर सुनावणी होऊन निकाल अद्यापही बाकी आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर करमाळा येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. निर्णय आपल्या बाजूने लागेल अशी आशाही विरोधकांना वाटत आहे. यासंदर्भात त्यांनी पुरावे व दाखले देत बाजू मांडली आहे. त्यामुळे आता निर्णय काय येईल याकडे जरी लक्ष लागून राहिले आहे तरी प्राध्यापक रामदास झोळ यांनी मात्र पूर्ण अनुभव पणाला लावत लढण्याची जिद्द ठेवल्यामुळे आता ही निवडणूक लागली आहे हे मात्र नक्की आहेतर उद्याचा निकाल बाजुने लागला तर पहिला विजयही असेल.

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मातब्बर नेत्यांनीही लक्ष घातले नाही. पण स्वाभिमानी शेतकरी संघटने सारख्या संघटना मात्र तिथे कायम संधी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु यावर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत संदर्भात शांत असतानाच मकाईची निवडणूक आपणच लढवणार ठरवणारे प्राध्यापक रामदास झोळ हे पुढे आले व त्यांनी विरोधकांनाही एकत्र केलं. बघता बघता जवळपास शेकडो लोक विरोधी गटात तयार झाले व लढण्याची तयारी करून लागले.

पण ऐनवेळी समोर आलेल्या नियमांच्या कचाट्यात बरेचसे उमेदवार अडकले व लोकशाही पद्धतीने निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला असतानाही काही नियमांच्या आधारे ती निवडणुकीच्या बाहेर पडले. बाहेरील कारखान्यात येवढे कठोर नियम नसताना मात्र मकाईत असे का हा प्रश्न विरोधकांना कायम सतावत होता. कधी थकबाकी तर कधी उस न घातल्याचे कारण पुढे केले. पण कारखानाच पाच वर्ष सुरु नसेल तर किंवा परवा नसेल तर उस कसा घालणार हा प्रश्न झोळ यांनी उपस्थित केला. पण तरीही सोलापूर येथील साखर संचालकांनी निर्णय विरोधात दिला.

त्यानंतरही थांबतील ते झोळ कसले झोळ सरांनी पुन्हा एकदा कंबर कसली व सोलापूर त्यानंतर उच्च न्यायालय दाद मागितल्या. त्यानंतर पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सुनावणी घेण्याचा आदेश दिला. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधी गटाच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. निकाल काही जरी लागला तरी प्राध्यापक झोळ यांनी निवडणुकीत वापरलेला अनुभव वाखाणण्याजोगा आहे.

शिंदे व गोडगेंची झोळ सरांना साथ …
नुकतेच पुणे येथील धर्मवीर संभाजी अर्बन बँकेच्या निवडणुकीत विजय मिळवणारे व सध्या पात्र उमेदवाराच्या यादीत असलेले सुभाष शिंदे यांनी पहिल्यापासून प्राध्यापक झोळ यांच्यासोबत आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गोडगे यांनीही एक दिवसही त्यांची साथ सोडली नसल्याने प्राध्यापक झोळ पूर्ण ताकतीने उभा आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE