करमाळासोलापूर जिल्हा

ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे एकाच गावात चोरांचा 2 वेळा चोरीचा प्रयत्न फसला

करमाळा समाचार -संजय साखरे

14/05/2023 रोजी करमाळा पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरी ता.करमाळा, जिल्हा_सोलापूर गावात रात्री 12:40 वाजता श्री सोमनाथ जालिंदर धुमाळ यांच्या घरी व रात्री 2:40 वाजता श्री तुकाराम अनंता दुरंदे यांच्या घरी 3-4 चोर चोरीच्या उद्देशाने आलेले आहेत.

हे कळताच गावचे सरपंच श्री अमोल दुरंदे आणि श्री गावातील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत साखरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600) सर्व गावाला व पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली.

politics

त्यामुळे तात्काळ गावकरी तसेच करमाळा पोलीस स्टेशनची नाईट राऊंडची गाडी घटनास्थळी दाखल झाले. आणि संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे लक्षात येताच,चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व दोन्ही घटनांमध्ये चोरांचा चोरीचा प्रयत्न फसला व पुढील अनर्थ टळला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE