करमाळासोलापूर जिल्हा

सोमवार, मंगळवार शिवसेनेच्या वतीने मोफत सर्वरोग निदान शिबीर

मोफत चष्मे वाटप व मोफत औषधे वाटप ; रुग्णांनी लाभ घ्यावा शिवसेनेचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी

18 एप्रिल व 19 एप्रिल दोन दिवस सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात सर्व आजाराची तज्ञ डॉक्टर द्वारे मोफत तपासणी करून मोफत औषधे देण्यात येणार आहे. तसेच डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्म्याचे वाटप करण्यात येणार असून या शिबिराचा लाभ करमाळा तालुका व शहरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन ठाणे यांच्यावतीने या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार व मंगळवार दिनांक 18 एप्रिल 19 एप्रिल या दोन दिवस सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अमरनाथ टावर कमलादेवी रोड करमाळा या ठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात ठाणे येथील प्रसिद्ध डॉक्टर सर्व रुग्णांची प्राथमिक तपासणी करणार आहेत. कोणाला काही गंभीर आजार किंवा शस्त्रक्रिया करण्याची गरज भासली तर त्याची सोय ही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे.

शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी युवा सेनेचे तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे, शहर प्रमुख विशाल गायकवाड, माजी शहरप्रमुख संजय आप्पा शीलवंत, संजय भालेराव, दीपक भोसले, संतोष गांगुर्डे, मोहम्मद कुरेशी, माझी उपशहर प्रमुख राजेंद्र काळे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रियंका ताई गायकवाड, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, करण काळे, नागेश शेंडगे, राजेंद्र मिरगळ, निलेश चव्हाण, संजय जगताप, मारुती भोसले, बापू दास पाटील, अण्णा सुपनर, अजिनाथ इरकर आदी शिवसेनेचे पदाधिकारी नियोजन करत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE