निर्णय रद्द झाला नाही तर सोलापूर जिल्ह्यातुन पाण्याच्या ऐवजी रक्ताचे पाट वाहतील ; कोषाध्यक्षपदी निवडीनंतर इशारा
करमाळा समाचार
उजणी धरण पाणी संघर्ष समिती सोलापूरचे अध्यक्ष मा.श्री.अतुलभाऊ खुपसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सचिव माऊली हळणवर, कार्याध्यक्ष सुहास घोडके यांनी निवड केली. सुदर्शन पाटील हे ते सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध निवदेक म्हणून काम करतात. तसेच वेगवेगळ्या मोर्चा टेंभुर्णी परिसरातील अग्रस्थानी सहभागी होते. त्यांचे वेगवेगळ्या मोर्चा मध्ये मुंडण आंदोलन गाजले होते.

तसेच ऊसबीलासाठी साखर संकुल शिवाजी नगर पुणे येथे साखर आयुक्तांच्या कार्यालयाचे कुलुप तोडून साखर संकुलणाचा ताबा घेण्यात सिंहाचा वाटा होता. त्यांना निवेदक व ऊस आंदोलन सामाजिक चळवळीतला धडाडीचा कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते. त्यांच्या या निवडीला श्री विठ्ठल आबा मस्के पाटील यांनी अनुमोदन दिले आणि उजणी धरण पाणी संघर्ष समिती सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बापुसाहेब मेटकरी यांनी आभार मांडले.
उजणी धरण पाणी संघर्ष समिती सोलापूर जिल्हाच्या विश्वासास पाञ राहुण काम करेण. तसेच निर्णय रद्द झाला नाही तर सोलापूर जिल्ह्यातुन पाण्याच्या ऐवजी रक्ताचे पाट वाहतील. उजणीचे 5 टीएमसी आमच्या हक्काचे आहे ते मिळाल्याशिवाय उजणी धरण पाणी संघर्ष समिती सोलापूर जिल्हा गप्प बसणार नाही असे नुतन कोषाध्यक्ष श्री.सुदर्शन पाटील यांनी सांगितले
