अवैध हातभटटी दारु धंदयांवर छापा एका महिलेसह दोघांवर कारवाई
करमाळा समाचार
करमाळा पोलीस ठाणेकडुन अवैध हातभटटी दारु धंदयांवर छापे टाकले आहेत. दोन आरोपींकडून एकूण ४७,०००/-रु किंमतीचा मुददेमाल जागीच नष्ट कराण्यात आला आहे. सदरची कारवाई वांगी व भाळवणी येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली.
विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंघाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून मा. पोलीस अधीक्षक साो श्री. अतुल कुलकर्णी सो यांनी अवैध धंदयावर कारवाई करण्याचे आदेश दिले, सदर आदेशाचे अनुषंघाने अपर पोलीस अधिक्षक डॉ. प्रितम यावलकर साो, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील साो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मा. विनोद घुगे यांनी पथक तयार करुन करमाळा पोलीस ठाणे हददीतील अवैध धंदयावर करक कारवाई करणेसंदर्भाने सुचना देवून रवाना केले.
गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, मौजे वांगी नं. १ ता. करमाळा येथे ढोकरी रोडला ओढयाच्या कडेला एक इसम चोरुन विनापरवाना हातभटटी दारुची भटटी चालवत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून वाहन मौजे वांगी नं. १ च्या पुढे ढोकरी रोडला पुलाजवळे थांबवून तेथे एक इसम प्लॅस्टीकचे बॅरेल चे बाजूस बसलेला दिसला. त्याचा पगुन्हयाचे कामी संशय आल्याने पथकाने त्यास जागीच पकडले.
त्याचे नाव गणेश सहदेव जाधव, वय ३७ वर्षे, रा. वांगी नं. १, ता. करमाळा, जि. सोलापूर असे सांगीतले व त्यास भटटीबाबत विचारणा केली असता त्याने हि माझीच दारु काढण्याची भटटी असल्याचे सांगीतले. सदर ठिकाणी पाहता तेथे एक निळया प्लॉस्टीकचे बॅरेल व एक लॉखडी पर्त्याचे बॅरल मिळून आले त्यात मानवी जिवीतास आपायकारक असे विषारी गुळ मिश्रीत रसायन व एका प्लॅस्टीक केंड मध्ये ५ लिटर हा. भ दारू मिळून आली.
तसेच मौजे भाळवणी ता. करमाळा येथे काळे वस्ती जवळ रेल्वे रुळाचे जवळ एक महीला चोरुन विनापरवाना हातभटटी दारुची भटटी चालवत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून तेथे एक महीला प्लॅस्टीकचे बॅरेल चे बाजूस बसलेली दिसली. तीचा प्रोव्ही गुन्हयाचे कामी संशय आल्याने महीला पोलीसांनी तीला जागीच पकडले तीचे नाव सिंधू दत्तू काळे, वय ५० वर्षे, रा.भाळवणी, ता. करमाळा, जि. सोलापूर असे सांगीतले.
गुन्हयांचा पुढील तपास सपोनि टिळेकर करत आहेत. सदरची कामगीरी ही श्री. अतुल कुलकर्णी साो, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक डॉ. प्रितम यावलकर साो, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील सो, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोसई / पाखरे, पोना/मनिष पवार, पोकॉ सोमनाथ जगताप, पोकॉ मिलींद दहिहांडे, मपोकॉ शारदा पारधी यांनी केली आहे.