उजनी जलाशय परिसरात उत्पन्न वाढीच्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक
करमाळा समाचार
मौजे-भिमानगर ता.माढा येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी जलाशयाच्या परिसरामध्ये सोलापूर जिल्हा टुरिझम आणि स्वयंरोजगार उपलब्ध करणेच्या दृष्टीने बैठक झाली.

यावेळी माढा तालुक्याचे आ. मा.बबनदादा शिंदे, करमाळा-माढा मतदारसंघाचे आमदार मा.संजयमामा शिंदे, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.मिलींद शंभरकर साहेब, सोलापूर जिल्हा वनविभागाचे उपसंचालक मा.धैर्यशील पाटील साहेब,प्रख्यात पक्षी निरीक्षक मा.डाॅ.व्यंकटेश मेतला, दैनिक सकाळचे संपादक मा.अभय दिवाणजी साहेब, माजी भारतीय वनसेवा अधिकारी मा.जयंत कुलकर्णी साहेब, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता मा.धीरज साळे साहेब,इको टुरिझमचे अनुभवी तज्ञ मा.सारंग कुलकर्णी साहेब,प्रातांधिकारी मा.सौ.ज्योती कदम मॅडम,माढा तालुक्याचे तहसीलदार मा.चव्हाण साहेब,

गटविकास अधिकारी मा.संताजी पाटील साहेब,उजनी धरणाचे कार्यकारी अभियंता मा.रावसाहेब मोरे साहेब,सार्व.बांधकाम विभागाचे अधिकारी मा.उबाळे साहेब व संबंधित अधिकारी यांचा कर्मचारी स्टाप उपस्थित होते.