करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

केत्तुर क्रमांक दोन येथील स्पर्धेत पै. मुन्ना झुंजुरके विजयी

करमाळा समाचार – नाना घोलप

पै. मुन्ना झुंजुरके ठरला चषकाचा मानकरी ठरला आहे. मौजे केत्तुर नं-२ ता- करमाळा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे जयंती निमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतुन अनेक नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती. लहान मोठ्या पैलवानांच्या कुस्त्यांनी मैदानात चांगलीच रंगत भरली होती.

या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असुन येथील पै. सागर पवार, पै. शंभु खैरे, पै. दादा पवार, पै. उदय पाटील, पै. राजसिंह अर्फ गोटया पाटील, पै. करण निकम यांचे सह मार्गदर्शक पै.संतोष शिंदे, पै. अनिल वस्ताद, पै. बाळु पवार व नामवंत मंडळींच्या यांचे मार्गदर्शनाप्रमाणे या कुस्त्या स्पर्धा संपन्न झाल्या. दिनांक-१५ मे २०२४ रोजी झालेल्या स्पर्धेमधे अंतिम लढतीत पै. मुन्ना झुंजुरके याने पै. संतोष जगताप याचेवर मात करून मानाची गदा जिंकली.

politics

या स्पर्धेसाठी आमदार. संजयमामा शिंदे यांचेसह हरिश्चंद्र जाधव, धनाजी पाटील, गणपतराव पाटील, पै.सुनील बापु सावंत, पै. दत्ता गायकवाड, तानाजी बापु झोळ, सुजीत बागल, आशिष गायकवाड, नितीन शिंदे, ॲड. नितीनराजे राजेभोसले, ॲड. अजित विघ्ने, प्रशांत नवले, गणेश गुंडगिरे, शंकर जाधव, नवनाथ फाळके, संभाजी भोपते, तानाजी येडे, ओमकार खाडे, ग्रा पं सदस्य सुजीत पाटील, अमोल चमरे, सरपंच सचिन वेळेकर, पवनराजे झाजुर्णे, पै. नाना वाघमोडे, विनोद बाबर यांचे सहअनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE